‘चिमणी’पाड्यातील अंधाराने एकास बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:21 IST2020-09-08T12:21:38+5:302020-09-08T12:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लाईट बंद केल्याच्या वादातून चिमणीपाडा, ता.नवापूर येथे तिघांनी एकास लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची ...

‘चिमणी’पाड्यातील अंधाराने एकास बदडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लाईट बंद केल्याच्या वादातून चिमणीपाडा, ता.नवापूर येथे तिघांनी एकास लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत तिघांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिमणीपाडा येथे बसस्थानक आवारात लाईट लावण्यात आला आहे. तो कुणी बंद केला म्हणून सुनील धर्मा पाडवी यांनी विचाणा केली. त्यावेळी आकाश पुनाजी वळवी, ओकेश जयंत वळवी, राकेश जयंत वळवी सर्व रा.चिमणीपाडा यांनी वाद घालून सुनील पाडवी यांना लोखंडी रॉडने मारून जखमी केले. त्यांच्यावर नंदुरबार येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विसरवाडी पोसिलात फिर्याद दिल्याने आकाश, ओकेश व राकेश वळवी यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार गावीत करीत आहे.