संरक्षक कठडय़ांविना पुलामुळे धोकेदायक स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:59 IST2019-08-04T13:59:39+5:302019-08-04T13:59:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : सध्या पाऊस होत असल्याने गोमाई नदीला पाणी आले आहे. मात्र या नदीवर प्रकाशा गावाजवळ ...

संरक्षक कठडय़ांविना पुलामुळे धोकेदायक स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : सध्या पाऊस होत असल्याने गोमाई नदीला पाणी आले आहे. मात्र या नदीवर प्रकाशा गावाजवळ असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे चोरीला गेल्या कठडय़ांविना हा पूल असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाचे लोखंडी कठडे वारंवार चोरीला जात असल्याने पोलिसांनी चोरटय़ांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
प्रकाशा गावालगत असलेली गोमाई नदीत सध्या तापी नदीचे फुगवटय़ाचे पाणी आल्याने काठोकाठ भरली आहे. या नदीवर असलेल्या पुलावरुन नांदरखेडा, सारंगखेडा, शेल्टी, सजदे, टेंभे या गावांकडे जाणा:यांची नेहमी वर्दळ असते. तसेच शेतकरी, शेतमजुरांचा हा मुख्य मार्ग आहे. मात्र या पुलाचे संरक्षक कठडे लोखंडी असल्याने ते चोरटय़ांनी चोरुन नेले होते.
सिंहस्थ पर्वणी काळात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे लोखंडी पाईप वेल्डींग करून बसवण्यात आले होते. मात्र ते पुन्हा चोरीला जात असल्याने हा पूल संरक्षक कठडय़ांविना आहे. नदीच्या पलिकडे येथील शेतक:यांची शेती असल्याने शेतकरी व मजुरांना रात्री-बेरात्री शेतात जावे लागते. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलाच्या कठडय़ांचे पाईप चोरणा:यांचा शोध घ्यावा व या पुलाला सिमेंट काँक्रिटचे कठडे बसवावेत, अशी मागणी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जयगणेश पाटील, अरुण चौधरी, सुरेश गोरख चौधरी, नारायण मोहन चौधरी व शेतक:यांनी केली आहे.