गोमाई नदीवरील संरक्षक भिंत कोसळल्याने धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:43 IST2019-11-24T12:43:10+5:302019-11-24T12:43:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाची संरक्षण भिंत तीन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरात कोसळल्याने ...

गोमाई नदीवरील संरक्षक भिंत कोसळल्याने धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाची संरक्षण भिंत तीन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरात कोसळल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघड पडले आहे. ठेकेदार व संबंधित अधिका:यांच्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
धुरखेडा येथील गोमाई नदीवरील संरक्षण भिंत तीन महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरात खचली आहे. बांधकाम विभाग आणि ठेका घेतलेल्या कंपनीने पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ही भिंत पूर्णपणे खचून नदीपात्रात आली आहे. त्यामुळे नदीचा काठ वाहून गेल्याने नव्याने सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. त्यातच नवीन पूल गेल्या वर्षापासून अपूर्णावस्थेत असल्याने गोमाई नदीतून प्रवाशांसह अवजड आणि इतर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. गोमाई नदी सातपुडय़ाच्या डोंगरद:यांमधून उगम पावते आणि ती वाहत असलेल्या भागात पावसाचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे या नदीच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असतो. संरक्षण भिंतीमुळे या नदीवरील पुलांना मजबूती मिळनार होती. मात्र संरक्षण भिंत कोसळल्यामुळे नव्याने बांधण्यात येणा:या पुलाला तसेच नदीलगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. नदीला मोठा पूर आला तर मोठी दुर्दैवी घटना घडू शकते. संबंधित विभाग व ठेका घेतलेल्या कंपनीने या घटनेकडे गांभीर्याने बघून नवीन संरक्षण भिंत तातडीने बांधावी. तसेच या अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलाचे कामही पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी या नदीमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.