सारंगखेडा ते कुकावल रस्त्यालगत काटेरी झुडपे वाढल्याने अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:24+5:302021-06-24T04:21:24+5:30
तरी संबंधित विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे काढणे व डागडुजी करणे गरजेचे आहे. याबाबत वेळोवेळी ‘लोकमत’ने वृत्त ...

सारंगखेडा ते कुकावल रस्त्यालगत काटेरी झुडपे वाढल्याने अपघाताचा धोका
तरी संबंधित विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे काढणे व डागडुजी करणे गरजेचे आहे. याबाबत वेळोवेळी ‘लोकमत’ने वृत्त प्रसारित केले; पण आजपावेतो कुठलेही काम करण्यात आले नाही. याच गलथानपणामुळे सारंगखेडा, कुकावल रस्त्यावर तालुका बीज गुणन केंद्र कळंबूजवळ फेब्रुवारी महिन्यात मोटारसायकल व कारच्या झालेल्या अपघातात कुकावल येथील एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. संबंधित विभागाने सारंगखेडा, कुकावल रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे काढणे व डागडुजी करणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहनचालकांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी मागणी सारंगखेडा, कळंबू कुकावल, परिसरातील वाहनचालक व नागरिकांकडून होते आहे.
कुकावल, कळंबू ते सारंगखेडा हा रस्ता परिसरातील वाहनचालकांसाठी शिरपूरकडे व कुकावलमार्गे मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी सोयीचा असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झाडेझुडपे वाढलेली आहेत. ती बऱ्याच दिवसांपासून तोडलेली नाहीत. यामुळे वाहनचालकांना वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी छोटे-मोठे अपघात होत आहेत, तरी संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.