नाचण्याच्या वादातून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 11:59 IST2019-06-17T11:59:21+5:302019-06-17T11:59:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : करंजाळी ता़ नवापुर येथे नाचण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाल़े शुक्रवारी रात्री ...

नाचण्याच्या वादातून हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : करंजाळी ता़ नवापुर येथे नाचण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाल़े शुक्रवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली़
करंजाळी शुक्रवारी रात्री विवाह सोहळा होता़ याठिकाणी विपुल कोमू गावीत हा मित्रांसह गेला होता़ दरम्यान सोनपाडा ता़नवापुर येथील बिपीन हरीष वळवी, रोशन रजेसिंग वळवी यांच्यासह युवकांचा एक गट आला होता़ रात्री आठ वाजेच्या सुमारास दोघा गटांमध्ये नाचण्यात धक्का लागल्याने वाद सुरु झाला़ यादरम्यान बिपीन वळवी, रोशन वळवी यांच्यासह 20 जणांच्या टोळक्याने विपुल गावीत, सुनील गावीत, आकाश वळवी, सुपडू वळवी, समुवेल वळवी आणि नरेंद्र वळवी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यात सर्व सहा जण जखमी झाल़े उशिरार्पयत सुरु असलेल्या या हाणामारीमुळे करंजाळी, सोनपाडा परिसरात भिती पसरली होती़ जखमींना तातडीने खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े उपचार पूर्ण झाल्यानंतर विपुल गावीत याने शनिवारी पहाटे दिलेल्या फिर्यादीवरुन बिपीन वळवी, रोशन वळवी यांच्यासह 20 जणांच्या टोळक्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक विजय वळवी करत आहेत़ पोलीस पथकाकडून संशयितांचा रविवारी शोध घेण्यात येत होता़ परंतू ते मिळून आलेले नसल्याची माहिती देण्यात आली आह़े हा प्रकार जुन्या वादातून घडल्याचेही बोलले जात आह़े
नवापुरात सध्या विवाहसोहळे सुरु आहेत़ यादरम्यान किरकोळ वादातून होणा:या मारामारीच्या घटनांमुळे तणाव निर्माण होत आह़े