नंदुरबार जिल्ह्यात बेमोसमी पावसाने उडविली दानादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:49 IST2018-04-13T12:49:56+5:302018-04-13T12:49:56+5:30

नंदुरबार जिल्ह्यात बेमोसमी पावसाने उडविली दानादान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ातील द:याखो:यात गुरुवारी बेमोसमी पावसान दानादान उडविली. अक्कलकुव्यात गारा पडल्या तर सुसरी नदी उगमस्थळ भागात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर आला. दरम्यान, तळोदा, शहादा, नंदुरबार तालुक्यातील काही भागात देखील पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावली.
गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा सुरू असलेल्या कहरमुळे नागरिक हैराण झाले होते. जनजिवनावर देखील परिणाम दिसून आला. परंतु गुरूवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाल्याने दिलासा मिळाला. सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील काही भागात पावसाचा जोर अधीक होता तर काही भागात तुरळक पाऊस झाला. अक्कलकुव्यात काही काळ हलक्या स्वरूपाच्या गारा पडल्या. सातुपडय़ातील सुसरी नदीच्या उगम क्षेत्रात पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्यामुळे नदीला सायंकाळी पूर आला. पूर पहाण्यासाठी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी गर्दी केली होती.
शहादा, नवापूर, तळोदा व नंदुरबार तालुक्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. बेमोसमी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
यामुळे तापमानापासून नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला. दुपारनंतर पारा 38 अंशावर स्थिरावरला होता.