धार्मिक स्थळाचे नुकसान करणा:याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 13:01 IST2019-08-20T13:01:21+5:302019-08-20T13:01:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील रायपूर येथील शनिमंदिरात शिरुन मूर्तीचे नुकसान करणा:याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...

Damage to religious sites: A criminal case has been registered against him | धार्मिक स्थळाचे नुकसान करणा:याविरोधात गुन्हा दाखल

धार्मिक स्थळाचे नुकसान करणा:याविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील रायपूर येथील शनिमंदिरात शिरुन मूर्तीचे नुकसान करणा:याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती़ 
रायपूर गावातील बसस्थानक परिसरात 300 वर्षे जुने शनिमंदिर आह़े शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश करुन मंदिरातील लाकडी मूर्ती ओटय़ाखाली ठेवून देत नुकसान केले होत़े सकाळी ग्रामस्थांना ही घटना दिसून आल्यानंतर त्यांनी नवापुर पोलीसांना माहिती दिली होती़ पोलीसांकडून घटनेची शहनिशा करुन परिसरात चौकशी करण्यात आली होती़ तणाव निर्माण होऊ नये, यासाठी मंदिर व परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा पोलीस पाटील आनंदा सोनजी पाडवी यांच्या फिर्यादीवरुन नवापुर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याठिकाणी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व सहायक पोलीस निरीक्षक डी़एस़शिंपी यांनी भेट पाहणी केली होती़ 

Web Title: Damage to religious sites: A criminal case has been registered against him