शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आंबा व चारोळीसह घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 1:42 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील राणीपूर परिसरासह साबलापाणी, नंबरपाडा व नागझिरी परिसरात मान्सूनपूर्व जोरदार वादळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील राणीपूर परिसरासह साबलापाणी, नंबरपाडा व नागझिरी परिसरात मान्सूनपूर्व जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे घरांसह आंबा व चारोळीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी संबंधित गावांना भेटी देत कृषी विभागासह मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्याचे तातडीने आदेश देण्यात आले आहेत.शहादा व धडगाव तालुक्यात गेल्या १५ दिवसात दोन ते तीन ठिकाणी पाऊस झाला. रविवारी सायंकाळी वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने साबलापाणी, नंबरपाडा व नागझरी परिसराला अक्षरश: झोडपून काढले. एक तासापेक्षा जास्तवेळ पाऊस झाल्याने नदी-नाल्यांमधून पाणी वाहत होते. यात नबरपाडा येथील जामसिंग सुलतान पावरा यांच्या दोन घराचे नुकसान झाले. साबलापाणी येथील अनेक घरांची छपरे उडाली. घरांमध्ये साठवलेला गुरांचा चारा पूर्णत: ओला झाल्याने चाºयाचे नुकसान झाले. दोन मोटारसायकलींचेही नुकसान झाले आहे.या वादळी पावसामुळे परिसरातील सुमारे २०० आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले असून कैºया जमिनीवर पडून खराब झाल्या. साठवलेल्या चारोळीचेही नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे आदिवासी बांधवांना आपल्या वस्तू व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी वेळ मिळाला नाही. मिरसिंग शंकर पावरा यांनी दहा-बारा वर्षापूर्वी हापूस व राजापुरी आंब्याची रोपे रत्नागिरीहून आणली होती. मेहनत करून झाडांना वाढवले होते. मात्र या झाडांवरील कैºया तुटून पडल्या तर काही झाडे मुळासकट जमिनीवर कोलमडून पडले. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी अधिकारी यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

शहादा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी व राणीपूर भागात रविवारी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी आमदार राजेश पाडवी यांनी केली असून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई अदा करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. या पावसामुळे व गारपिटीमुळे अनेकांचे नुकसान झाले असून सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त गावातील राणीपूर, नागझिरी, नंबरपाडा, साबलापाणी, आदाºयापाडा येथे नुकसानीची पाहणी आमदार पाडवी. या वेळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, वीरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, सुकलाल रावताळे, सचिन पावरा, कमल पावरा, हितेश मेडेकर, रामदास पावरा व कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी येथील कृषी विद्यापीठातून हापूस व राजापुरी या आंब्यांचे दहा ते बारा वर्षापूर्वी रोपे आणली होती. परिसरातील लोकांना चांगल्या दर्जाचे व स्वस्त आंबे देण्याची इच्छा होती. मात्र मान्सूनपूर्व पावसाने झाडे व आंबा फळाचे नुकसान केल्याने या फळांची चव आता लोकांना मिळणार नाही.-मेलसिंग शंकर पावरा, शेतकरी, साबलापाणी.