पावसाचे पाणी शिरुन घराचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 01:01 PM2020-06-05T13:01:18+5:302020-06-05T13:01:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : निसर्ग चक्रीवादळाचे दुष्परिणाम तालुक्यात जाणवले नसले तरी बुधवारी दिवसभर पाऊस सुरू होता. तालुक्यात सरासरी ...

Damage to house by rain water | पावसाचे पाणी शिरुन घराचे नुकसान

पावसाचे पाणी शिरुन घराचे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : निसर्ग चक्रीवादळाचे दुष्परिणाम तालुक्यात जाणवले नसले तरी बुधवारी दिवसभर पाऊस सुरू होता. तालुक्यात सरासरी ४४ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती महसूल विभागामार्फत देण्यात आली. सर्वाधिक १०५ मिलिमीटर पाऊस म्हसावद मंडळ तर सर्वात कमी नऊ मिलिमीटर पाऊस मंदाणे मंडळात झाला आहे. शहादा शहरात सालदारनगर भागात एका महिलेच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बुधवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. रिमझिम सुरु असलेल्या पावसाने रात्री दहानंतर जोर धरला होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे सालदारनगर भागातील गुंताबाई कृष्णा माळी या महिलेच्या घराचे नुकसान झाले आहे. पावसामुळे घराचे छप्पर व भिंत असल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरले. संपूर्ण घरात चिखलाचा खच झाला होता. यात घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. पावसामुळे घरात थांबणेही शक्य नसल्याने महिला व तिच्या कुटुंबीयांनी संपूर्ण रात्र शेजाऱ्यांकडे आसरा घेऊन काढली. महसूल विभागामार्फत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. या पावसामुळे तापमानातही कमालीची घट झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
तालुक्यात बुधवारी मंडळनिहाय झालेला पाऊस (मिमिमध्ये) असा कंसात एकूण : शहादा ४८ (५१), प्रकाशा ४५ (४७), कलसाडी ५५ (५९), म्हसावद १०५ (१०७), ब्राह्मणपुरी ६२ (६२), असलोद १३ (१३), मंदाणे ९ (९), वडाळी २४ (३५), सारंगखेडा ३९.४ (४१.४), मोहिदे ३७ (४८).

Web Title: Damage to house by rain water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.