प्रकाशा परिसरात मूग व उडीद पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:55 IST2020-08-26T12:54:40+5:302020-08-26T12:55:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर क्षेत्रातील मूग व उडीद पिकाचे सततच्या पावसामुळे ...

प्रकाशा परिसरात मूग व उडीद पिकाचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर क्षेत्रातील मूग व उडीद पिकाचे सततच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेल्या मूग पिकाच्या शेंगांमध्ये कोंब फुटल्याने हे पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
प्रकाशा परिसरात गेल्या १५ ते २० संततधार पाऊस सुरू आहे. अद्याप सूर्यदर्शन झालेले नाही. या पावसामुळे शेतांमध्ये पाण्याचे मोठमोठे डबके साचले आहेत. मजुरांना रोजगार उपलब्ध होत नाही. परिसरातील शेतकऱ्यांनी शेकडो एकर क्षेत्रात मूग व उडीद पिकाची पेरणी केली होती. मात्र या पावसामुळे परिपक्व झालेल्या या पिकांचे झाडावरच शेंगांना कोंब फुटल्याने ही पिके पूर्णत: वाया गेली आहे. पावसात जरी शेंगा तोडल्या असत्या तरी त्यांना उन्हाची गरत होती. यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होत असून या पिकांवर झालेला खर्चही निघणे मुश्कील झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. सोयाबीनच्या शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या पिकाचेही नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी सचिन सखाराम चौधरी, हरी दत्तू पाटील, महेश काशिनाथ चौधरी, भटू छगन चौधरी, संजय तुकाराम पाटील, अरविंद विठ्ठल पाटील, रतिलाल ओंकार पाटील, अंबालाल रामू चौधरी, नटू कोळी, अमोल सोमजी पाटील यांच्यासह इतर शेतकºयांनी केली आहे.