शेतातील पपईची झाडे कापून फेकल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:23 IST2019-10-13T12:23:04+5:302019-10-13T12:23:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सारंगखेडा येथील शेतकरी जगदीश शांतीलाल पाटील यांच्या शेतात मे महिन्यात लावण्यात आलेली पपईची बहरलेली ...

शेतातील पपईची झाडे कापून फेकल्याने नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : सारंगखेडा येथील शेतकरी जगदीश शांतीलाल पाटील यांच्या शेतात मे महिन्यात लावण्यात आलेली पपईची बहरलेली 11 झाडे अज्ञात माथेफिरूने 11 ऑक्टोबर रोजी कापून फेकल्याने शेतक:याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
अगदी लहान मुलांप्रमाणे वाठवलेली झाडे कापून फेकल्याने या माथेफिरूचा त्वरित शोध लावावा, अशी मागणी शेतक:यांकडून केली जात आहे.
दरवर्षी शहादा तालुक्यात अशा घटना घडत असतात. आधीच अतिवृष्टीने शेतक:यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून, काही शेतक:यांनी कसरत करीत पिके वाचवली आहेत. मात्र बहरात असलेली पिके माथेफिरूंकडून कापून फेकण्यात येत असल्याने शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे संबंधितांनी रात्रीच्या वेळी या परिसरात गस्त वाढवून अशा माथेफिरूंचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीद्वारे केली आहे.