खांडबारा रेल्वे गेटवर रिक्षा आदळून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 22:02 IST2020-11-03T22:02:08+5:302020-11-03T22:02:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : भरधाव वेगातील ॲपे रिक्षा गेटवर आदळल्याने गेटचे नुकसान झाल्याची घटना खांडबा-यात घडली आहे. रविवारी ...

खांडबारा रेल्वे गेटवर रिक्षा आदळून नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : भरधाव वेगातील ॲपे रिक्षा गेटवर आदळल्याने गेटचे नुकसान झाल्याची घटना खांडबा-यात घडली आहे. रविवारी सकाळी नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात रेल्वे क्रॉसिंगवर भरधाव वेगाने ॲपे रिक्षा गेटला धडकली या धडकेत रेल्वे गेट चे नुकसान झाले आहे.
दरम्यान रिक्षा धडकल्याने रिक्षाचालक वाहनाचा पसार झाला या अपघात प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खांडबारा गावाच्या मध्यवर्ती भागात रेल्वे मार्ग असल्याने नेहमीच याठिकाणी वाहनांची वर्दळ असते त्यातच रेल्वे गेट लागून भुयारी बोगद्याचे काम अनेक पासून बंद होते. गेल्या दोन दिवसांपासून या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. सदर रेल्वेमार्ग नेहमी नागरिकांची वर्दळ असते यावेळी रीक्षा रेल्वे गेटवर धडकली असताना असता सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नसून मोठी दुर्घटना टळली. रेल्वे बोगदा चे काम संथगतीने सुरू असल्यामुळे रेल्वेमार्ग वाहनांची ये-जा सुरू असते.
यामुळे नेहमी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते म्हणून रेल्वे बोगद्याचे काम पूर्ण करून वाहतूक सुरू करावी अशी मागणी खांडबारा गावातील ग्रामस्थांनी केली आहे.