अज्ञात माथेफिरूकडून २०० केळी रोपांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:37+5:302021-07-14T04:35:37+5:30

सविस्तर वृत्त असे की, सुलतानपूर येथील शेतकरी निंबा देविदास पाटील यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात (सर्वे नंबर ११६ ) ...

Damage to 200 banana seedlings from unknown headgear | अज्ञात माथेफिरूकडून २०० केळी रोपांचे नुकसान

अज्ञात माथेफिरूकडून २०० केळी रोपांचे नुकसान

सविस्तर वृत्त असे की, सुलतानपूर येथील शेतकरी निंबा देविदास पाटील यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात (सर्वे नंबर ११६ ) सुमारे दोन हजार रोपांची लागवड महिनाभरापूर्वी केली होती. नेहमीप्रमाणे निंबा पाटील हे शेतात ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत होते. हळूहळू दीड एकर क्षेत्रातील सुमारे २०० केळीची रोपे वाळायला (जळायला) लागली. निंबा पाटील यांनी ही बाब जवळील शेतकऱ्यांना सांगितली असता अज्ञात माथेफिरूने तणनाशक फवारणी करून रोपांचे नुकसान झाल्याचे समजले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला हजारो रुपयांचा फटका बसला असून आर्थिक नुकसान झाले आहे.

मी माझ्या दीड एकर क्षेत्रात केळी रोपांची लागवड केली आहे. त्यात अज्ञात माथेफिरूने सुमारे २०० रोपांवर तणनाशक फवारणी मारत रोपे जाळून टाकली आहेत. त्यामुळे मला आर्थिक फटका बसला आहे.

-निंबा देविदास पाटील, शेतकरी, सुलतानपूर, ता. शहादा.

Web Title: Damage to 200 banana seedlings from unknown headgear