आसाणे येथे दाम्पत्यास मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:00 IST2019-07-21T12:00:28+5:302019-07-21T12:00:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील आसाणे येथे जमिनीच्या वादातून दाम्पत्यास जमावाने मारहाण केली़ आठ जुलै रोजी ही घटना ...

Dacoits assault in Assam | आसाणे येथे दाम्पत्यास मारहाण 

आसाणे येथे दाम्पत्यास मारहाण 

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील आसाणे येथे जमिनीच्या वादातून दाम्पत्यास जमावाने मारहाण केली़ आठ जुलै रोजी ही घटना घडली़  
दादाभाई गेंदा ठेलारी यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीवर चोपडे व कोळपे कुटूंबियांना मेंढय़ा ठेवणे व निवासासाठी जागा दिली होती़ याबदल्यात त्यांनी ठरलेली रक्कम मागितली होती़ परंतू संशयितांनी रक्कम देण्यास नकार दिला होता़ 8 जुलै रोजी काशीनाथ कोळपे, दगडू चोपडे, सोनू चोपडे, पंढरीनाथ चोपडे, धोंडीराम चोपडे, ताना चोपडे, राजू चोपडे, पावबा चोपडे, ज्योतीराम चोपडे, सुमनबाई येडे, देवा येडे, भिवा येडे, रेशमाबाई कोळपे व रेशमाबाई चोपडे सर्व रा़ आसाणे यांनी दादाभाई ठेलारी व त्यांच्या पत्नीस मारहाण केली़ यात दोघांना दुखापत झाली़ दादाभाई ठेलारी यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल बुनकर करत आहेत़ 
 

Web Title: Dacoits assault in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.