म्हसावद येथे संचारबंदीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST2021-04-17T04:30:00+5:302021-04-17T04:30:00+5:30

खेड्यापाड्यात कोरोना पसरल्याने सर्व रुग्ण म्हसावद येथे येत आहेत.खासगी दवाखान्यातही बेड शिल्लक नाही. आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेतल्याचे नाटक ...

Curfew at Mhasawad | म्हसावद येथे संचारबंदीचा फज्जा

म्हसावद येथे संचारबंदीचा फज्जा

खेड्यापाड्यात कोरोना पसरल्याने सर्व रुग्ण म्हसावद येथे येत आहेत.खासगी दवाखान्यातही बेड शिल्लक नाही. आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेतल्याचे नाटक करीत असल्याने सामान्यांमध्ये जवळपास सर्वच व्यवहार सुरू असल्याने लॉकडाऊन व संचारबंदी नावालाच उरली आहे.परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊनमध्ये कोणती दुकाने बंद व कोणती दुकाने सुरू याचा थांगपत्ताच नाही. सर्वच दुकाने हाफ शटरडाऊन करून सुरूच ठेवत असल्याने गर्दी वाढत आहे. आधीच खेड्यावरून येणाऱ्या रुग्णांची गर्दी जास्त आहे. मेडिकल,भाजीपाला याशिवायही बरीच दुकाने सुरू ठेवली जात आहेत. ढाब्यांवर देशी व विदेशी दारू,बीअर विक्री समोरून बंद मागून चालू असे चालू अशाप्रकारे होत आहे.पोलीस बघ्याची भूमिका घेत असून म्हसावदला पोलीस स्टेशन असूनही कुचकामी ठरत आहे.जे दुकानदार प्रामाणिकपणे दुकान बंद ठेवत आहेत त्यांनी प्रशासनावर ठपका ठेवला आहे.तर काही दुकानदार लालसेपोटी लॉकडाऊन असूनही हाफ शटरडाऊन करून व्यवहार करीत आहेत.कोरोना नियमांचे उल्लंघन अंतर्गत कार्यवाही होणे गरजेचे झाले आहे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Curfew at Mhasawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.