शहाद्यातील सांस्कृतिक शोभयात्रेने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:51 IST2020-03-13T12:51:37+5:302020-03-13T12:51:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात ...

शहाद्यातील सांस्कृतिक शोभयात्रेने वेधले लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले़ यातील शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले़ प्रारंभी डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला़
यावेळी जिल्हा शिवसेनेचे प्रमुख आमच्या पाडवी, माजी शिवसेना प्रमुख अरुण चौधरी, खानदेश मराठा समाजाचे समन्वयक श्याम दिनकर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर मिस्त्री, तालुका संघटन प्रमुख भगवान अलकरी, शहादा शहर प्रमुख तुषार पाटील, गणेश राजे पाटील, रोहन माळी, बापू सूर्यवंशी, रमेश पवार, उत्तम पाटील, दिलीप पाटील, सुरेश मोरे, मनोज सोनार, पविन सैंदाणे, बिपीन सोनार यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते़ प्रतिमापूजानंतर शहरातून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला़ कार्यक्रमात राणीपूर येथील आदिवासी बांधवांच्या कलापथकांनी सहभाग नोंदवला़ रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध मार्गांवरुन ही मिरवणूक सुरु होती़