मदर टेरेसा स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 02:12 PM2020-02-25T14:12:50+5:302020-02-25T14:12:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील सेंट मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख ...

Cultural events at Mother Teresa School | मदर टेरेसा स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

मदर टेरेसा स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील सेंट मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या वेळी जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा दिलीपराव मोरे, सचिव डॉ.अभिजित मोरे, पालक प्रतिनिधी प्रतिभा जव्हेरी, किशोर गोसावी उपस्थित होते. शैक्षणिक वर्षात झालेल्या वेगवेगळया क्षेत्रात यश संपादन करणारे विद्यार्थी व पालकांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी वसुमना पंत यांनी शाळेची प्रशंसा करुन या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी दिली जाते ही चांगली बाब असल्याचे सांगितले. प्रतिभा जव्हेरी यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका मोना मित्तल यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. त्यात नरवीर तानाजी मालुसरे, सर्जिकल स्ट्राईक, महिला सुरक्षा, प्राणी वाचवा अशा विषयावर कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Cultural events at Mother Teresa School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.