सातपुड्याचा सांस्कृतिक केंद्रबिंदू काठीची राजवाडी होळी यंदा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST2021-03-13T04:55:42+5:302021-03-13T04:55:42+5:30

काठी व परिसरातील होलिकोत्सव आयोजनासंदर्भात बुधवारी मोलगी पोलीस ठाण्याच्या आवारात संयुक्त समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी तहसिलदार ...

The cultural center of Satpuda will be the Kathi Rajwadi Holi this year | सातपुड्याचा सांस्कृतिक केंद्रबिंदू काठीची राजवाडी होळी यंदा होणार

सातपुड्याचा सांस्कृतिक केंद्रबिंदू काठीची राजवाडी होळी यंदा होणार

काठी व परिसरातील होलिकोत्सव आयोजनासंदर्भात बुधवारी मोलगी पोलीस ठाण्याच्या आवारात संयुक्त समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी तहसिलदार गिरीश वखारे, जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव कदम ,मोलगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्यासह मोलगी व काठी परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, महिला दक्षता समिती व नागरिक उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार गिरीश वखारे यांनी केंद्र व राज्य सरकार याचे कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती करून दिली. बैठकीत सर्वानुमते चर्चा करून महाशिवरात्री व होळी सण आपापल्या गावात भक्तिभावाने विधिवत पूजा करून शांततामय वातावरणात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे.

काठी येथील मानाच्या राजवाडी होळीला ९०० वर्षांपेक्षा अधिकची परंपरा आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव होणार किंवा कसे, हा संभ्रम होता. परंतु बैठकीतून सूचनांचे पालन करत होळी साजरी करण्याचा निर्णय झाल्याने दुर्गम भागात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. काठी येथील मानाच्या राजवाडी होळीसाठी जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी, काठी संस्थानचे महेंद्रसिंग पाडवी, राजेंद्र पाडवी, पृथ्वीसिंग पाडवी, शेरसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनात काठी येथील बहादूरसिंग पाडवी, गणपत पाडवी, सागर पाडवी, करमसिंग पाडवी, पोलीस पाटील रणजित पाडवी हे परिश्रम घेत असून त्यांच्याकडून वेळोवेळी तयारीचा आढावा घेतला जात आहे.

दुर्गम भागात होळीच्या तयारीला आला वेग

दरम्यान होळीसाठी नवस करणाऱ्यांची तयारी सुरु झाली आहे. बावा-बुध्या यांची पथके सज्ज होत असल्याचे दिसून येत आहे. यातून गावोगावी चैतन्य आहे. मास्कचा वापर कटाक्षाने करत तयारी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि हातांची स्वच्छता यावरही भर देण्यात येणार असल्याने यंदा उत्सव कोविड नियमांसह होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोविड नियमांचे होणार पालन

दरम्यान झालेल्या बैठकीत बाहेरगावाहून यंदा कोणीही व्यावसायिक गावात येऊन दुकाने थाटणार नाहीत. सोंगाड्या पार्टीचे आयोजन होणार नाही. प्रत्येक नागरिक मास्क वापरून वापरून सुरक्षित अंतर राखून होळीची पूजा करतील. गर्दी होणार नाही याची काळजी घेऊनच होळी सण साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीनेच होलिकाेत्सव साजरा होणार आहे. पूजनसह सर्व विधी नेहमीप्रमाणेच करण्यात येतील असेही बैठकीत ठरवण्यात आले. कोविड नियमांचे पालन करुन हे सर्व धार्मिक कार्यक्रम होतील अशी माहिती देण्यात आली.

Web Title: The cultural center of Satpuda will be the Kathi Rajwadi Holi this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.