नंदुरबारातील सिंधी कॉलनीत किरकोळ वादातून एकाचा ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:46 IST2019-02-27T11:46:51+5:302019-02-27T11:46:59+5:30
नंदुरबार : शहरातील जुनी सिंधी कॉलनी परिसरात दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ या घटनेने ...

नंदुरबारातील सिंधी कॉलनीत किरकोळ वादातून एकाचा ठेचून खून
नंदुरबार : शहरातील जुनी सिंधी कॉलनी परिसरात दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीसांनी सहा तासात तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे़
जुनी सिंधी कॉलनी परिसरातील सिंधी समाज लाडकाना मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस एकाच मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे रहिवाशांना दिसून आले होते त्यांनी पोलीसांना माहिती दिल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने याठिकाणी भेट दिली़ चौकशीअंती हा मृतदेह जुनी सिंधी कॉलनी येथील दिलीपकुमार गुरनामल राजपाल (४७) यांचा असल्याची माहिती समोर आली होती़ दिलीपकुमार राजपाल यांच्या डोक्यावर दगडाने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता़ सोमवारी रात्री १० ते मंगळवारी सकाळी ९ वाजेदरम्यान खुनाची घटना घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीसांकडून तपास करण्यात येत होता़ अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी घटनेची माहिती घेत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाची नियुक्ती केली होती़ नियुक्त पथकाने परिसरात चौकशी करुन अवघ्या सहा तासात तिघांना सिंधी कॉलनीतून अटक केली़ पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र पाडवी, पोलीस नाईक कपिल बोरसे, राकेश मोरे यांनी संशयितांना ताब्यात घेतले़
याबाबत मोहन गुरनामल राजपाल रा़ जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार करत आहेत़