शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावदच्या आठवडे बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : म्हसावद : परिसरात कोरोनाविषयी जनजागृती होऊनही ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक बेजबाबदारीने फिरत आहेत. त्यांच्यावर ग्रामपंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : म्हसावद : परिसरात कोरोनाविषयी जनजागृती होऊनही ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक बेजबाबदारीने फिरत आहेत. त्यांच्यावर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ जनतेने केली आहे.
सोमवारी बाजाराचा दिवस असल्याने म्हसावद परिसरातील ३० ते ४० खेड्यावरील लोकं दैनंदिन व्यवहारासह बाजारहाटसाठी येतात. सर्वदूर कोरोनाने धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरायला सुरूवात झाली आहे. मात्र म्हसावद परिसरात अजून सुदैवाने कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. परिणामी या भागातील जनता बेफिकीर होऊन स्वत:ला काहीच होणार नाही या आवेशात येऊन फिरत आहेत. मोटारसायकलवर चार-चार, पाच-पाच सीट बसून मास्क न लावता फिरत आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून बाजारात ना मास्क, ना सामाजिक अंतर कशाचीही तमा न बाळगता जनता फिरत आहे. तर ते पाहून ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनही सुस्त झाले आहे. पोलिसांनीही नवलाईचे नऊ दिवस बाजारात बंदोबस्त ठेवून कार्यवाही केली. आता मात्र पोलिसांनी कानाडोळा केल्याने नागरिक बिनधास्त फिरत आहेत.
ग्रामपंचायतमार्फतही दुसऱ्यांदा औषधी फवारणी करण्यात आली. मास्क व सॅनिटायझर वाटपही केले. मात्र आता ग्रामपंचायतीलाही कोरोनाचा विसर पडल्याचे दिसत आहे. याउलट येथील व्यापारी असोसिएशनने स्वत:हून तीन दिवसाचा लॉकडाऊन घेण्यास लावून स्तुत्य कामगिरी बजावली. कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी परिसरातील जनतेसह म्हसावद येथील सुज्ञ ग्रामस्थांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.