किराणा खरेदीसाठी पुन्हा उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:07 IST2020-04-28T13:07:29+5:302020-04-28T13:07:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली ...

किराणा खरेदीसाठी पुन्हा उसळली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या लक्षणिय असल्याचे दिसून आले. शहरात विनाकारण फिरणाºयांवर करायचे काय, तसेच गर्दी कशी कमी होणार असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
शहरात कोरोनाचे चार रूग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने कन्टेन्मेंट झोनमधील सर्व प्रतिष्ठाने बंद केले होते. रविवारपासून नागरिकांना अत्यावश्यक वस्तू, किराणा माल व दूध खरेदी करण्यासाठी दररोज सकाळी आठ ते बारा या कालावधीत संचार बंदीमधून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र याच काळात शहरात सर्वाधिक गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सींग या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.
सर्वाधिक जास्त गर्दी किराणा दुकानांमध्ये दिसून येत असून, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक चेहºयाला मास्क लावण्याचे सौजन्य दाखवत नाही. दररोज सकाळी चार तास किराणा दुकान उघडे राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असले तरी खरेदीला येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात किराणा खरेदी करत असल्याने गर्दीचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष म्हणजे किराणा दुकानातील अनेक साहित्याचे दर वाढलेले आहेत.
दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने शहरात विनाकारण भटकण्याची जणूकाही स्पर्धाच लागली आहे. नागरिक मोटरसायकल घेऊन शहरात मनसोक्त भटकंती करत आहे. परिणामी शहरात सलग दुसºया दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी गर्दी करू नये, सुरक्षित अंतर ठेवा असे असे आवाहन केले जात असले तरी याचा फारसा परिणाम गर्दीवर जाणवत नव्हता. याउलट पोलिसांची गाडी गेली की पुन्हा जैसे थे परिस्थिती होत होती. विशेष म्हणजे कन्टेन्मेंट झोनमधील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने सोमवारी खुली करण्यात आल्याने याच भागात गर्दीचे सर्वाधिक प्रमाण होते.
प्रशासनाच्यावतीने शहरातील पाच किलोमीटर अंतरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना व शेतीविषयक कामासाठी पेट्रोल डिझेल देण्यासाठी सूट असली तरी शहरात भटकंती करणाºया मोटरसायकल स्वारांना सहजरित्या पेट्रोल कसे काय उपलब्ध होते हा संशोधनाचा विषय झाला आहे. प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर तसेच विनाकारण शहरात फिरणाºयांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.