आठवडे बाजारात उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:22+5:302021-06-09T04:38:22+5:30
नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाने अनलाॅक करत सर्व व्यवहार खुले करण्यास परवानगी दिली आहे. यातून शहरातील मंगळवारचा ...

आठवडे बाजारात उसळली गर्दी
नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाने अनलाॅक करत सर्व व्यवहार खुले करण्यास परवानगी दिली आहे. यातून शहरातील मंगळवारचा आठवडा बाजार पूर्ण क्षमतेने भरल्याचे दिसून आले. यावेळी कोविड नियमांचा भंग होत असल्याचे दिसून आले.
शहरातील सुभाष चाैक, मंगळबाजार,स्टेशन रोड आणि शास्त्री मार्केेट परिसरात ही गर्दी झाली होती. ग्रामीण भागातून खरेदीसाठी नागरिक आले असल्याने या भागात वाहतुकीची कोंडीही झाली होती. लाॅकडाऊननंतर सुरू झालेल्या पहिल्या आठवडे बाजारात कैरी आवक झाल्याने खरेदीसाठी गर्दी उसळली होती. यंदा कैरीचे दरही कमी असल्याने नागरिकांकडून खरेदीला प्रतिसाद दिला गेला.
दरम्यान पोलीस दलाकडून पथक तैनात करून बेशिस्तांवर कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून आले होते. यातून मास्क नसलेल्या अनेकांची धावपळ होत होती.
एकीकडे भाजीपाला बाजारात गर्दी वाढत असताना कपडे खरेदीसाठी शास्त्री मार्केट परिसरात गर्दी झाल्याचे दिसून आले होते. मंगळवारी कैरी व कपड्यासह इतर वस्तूंच्या खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल झाली.