धार्मिक स्थळे उघडल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:51 IST2020-06-09T11:51:35+5:302020-06-09T11:51:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनलॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे अटी व शर्र्तींच्या अधीन राहून सुरू करण्यास परवाणगी देण्यात आल्याने ...

धार्मिक स्थळे उघडल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनलॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे अटी व शर्र्तींच्या अधीन राहून सुरू करण्यास परवाणगी देण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रकाशा, सारंगखेडा येथील धार्मिक स्थळांसह नंदुरबारातील मंदीरे देखील सुरू झाली.
अनलॉकडाऊन मध्ये सोमवारपासून धार्मिक स्थळे उघडण्यास देखील परवाणगी देण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी प्रार्थना व पूजास्थळे उघडली. एकावेळी एकालाच मंदीराच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात होता. मंदीरात पाच पेक्षा अधीक जणांना प्रवेश नाकारण्यात येत होता. आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे नंदुरबारातील गणपती मंदीर आणि वळण रस्त्यावरील दंडपाणेश्वर गणपती मंदीरावर सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी येथे भाविकांना प्रतिक्षा करावी लागत होती.
धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली असली तरी सामुहिक रित्या आरती, भजन, संकीर्तन किंवा त्या त्या धर्माप्रमाणे सामुहिक रित्या कुठलाही कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदीरात येतांना मास्क लावणे बंधनकारक तसेच दोन जणांमध्ये अंतर ठेवूनच उभे राहणे आवश्यक आहे.
मूर्तीला हात लावता येणार नाही, घंटा वाजवता येणार नाही. मंदीरात जास्त वेळ थांबता येणार नाही अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत.
नंदुरबारातील गणपत मंदीरात सकाळी एकच दरवाजा उघडण्यात आला होता. त्याद्वारे प्रत्येकी एकाला दर्शनासाठी आत सोडण्यात येत होते.