खाजगी रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:08+5:302021-03-19T04:29:08+5:30

नंदुरबार शहरात तीन ते चार ठिकाणी सिटीस्कॅन सेंटर्स आहेत. या सेंटर्सवर सध्या सकाळपासून तपासणीसाठी येणाऱ्यांची गर्दी होत आहे. ग्रामीण ...

Crowds for CTscans in private hospitals | खाजगी रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनसाठी गर्दी

खाजगी रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनसाठी गर्दी

नंदुरबार शहरात तीन ते चार ठिकाणी सिटीस्कॅन सेंटर्स आहेत. या सेंटर्सवर सध्या सकाळपासून तपासणीसाठी येणाऱ्यांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागासह जिल्ह्यातील तळाेदा, अक्कलकुवा, धडगाव व नवापूर येथील रुग्ण याठिकाणी येत आहेत. सोबतच शहादा येथील सिटीस्कॅन सेंटर्सवरही तोबा गर्दी उसळत असल्याचे समोर आले आहे. घश्यातील स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्यानंतरही अनेकांना ताप किंवा इतर लक्षणे असल्यास सिटीस्कॅन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन सेंटरही सुरू झाल्याने दुर्गम भागातील नागरिकांची सोय झाली आहे. जिल्हा रुग्णालयात सुविधा असली तरी बहुतांश नागरिक खासगी सेवेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. यातून कोरोनाची खातरजमा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, जिल्ह्यात सिटीस्कॅन सेंटर्सवर होणारी गर्दीही काहीअंशी कोरोना संसर्गाला आमंत्रण देणारी असल्याने संबंधित खासगी सेंटरचालकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे.

Web Title: Crowds for CTscans in private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.