लग्न समारंभात गर्दी, दोन आयोजकांवर नंदुरबारात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST2021-05-05T04:49:27+5:302021-05-05T04:49:27+5:30
नंदुरबार : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्न समारंभावर लावण्यात आलेले निर्बंधांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. नंदुरबार शहरासह तालुक्यातील निंबेल ...

लग्न समारंभात गर्दी, दोन आयोजकांवर नंदुरबारात गुन्हा
नंदुरबार : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्न समारंभावर लावण्यात आलेले निर्बंधांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. नंदुरबार शहरासह तालुक्यातील निंबेल येथे लग्न समारंभात गर्दी केल्याने आयोजकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
नंदुरबारातील गवळीवाडा भागात गवळी परिवारात सुरू असलेल्या लग्न समारंभात २५ पेक्षा अधिकजण आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी नंदुरबारातील आयोजक विशाल गवळी (रा. नंदुरबार), अरुण आबाजी गवळी (रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव) यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल केला. निवासी नायब तहसीलदार भीमराव बोरसे यांनी फिर्याद दिली.
निंबेल येथे देखील अशाच प्रकारचा लग्न समारंभ सुरू असताना तेथेही २५ पेक्षा अधिकजण आढळले. त्यामुळे मंडळ अधिकारी प्रशांत देवरे यांनी फिर्याद दिल्याने आयोजक अशोक बारकू पाटील यांच्यासह नातेवाईक व बॅण्डपथक प्रमुखासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाने लागू केलेल्या संपूर्ण संचारबंदीनंतर ही पहिली कारवाई आहे.