शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:14 PM

सुविधांचा अभाव : 40 लाखांचा निधी उपलब्ध मात्र कामांना सुरूवात नाही

तळोदा : तालुक्यातील सातपुडय़ाच्या पर्वत रांगेतून उगम पावणारा व जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला वाल्हेरी येथील धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. दरम्यान सुविधा नसल्याने मोठय़ा प्रमाणावर गैरसोय वाढली आहे.वाल्हेरी हे ठिकाण तालुक्यातून जाणा:या ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या उत्तरेस सातपुडय़ाच्या पायथ्याशी आहे. येथे जाण्यासाठी सोमावल गावावरून जाता येते. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी या ठिकाणीचे धबधबे ओसंडून वाहत आहेत.पावसाचे प्रमाण कमी असल्याचा या धबधब्यावर कुठलाही परिणाम होत नाही. येथे चहुबाजूने वेढलेल्या हिरव्यागार टेकडय़ा, वृक्ष, वेली या निसर्गाच्या सानिध्यामुळे या धब धब्याचे सौदर्य अजूनच खुलून दिसत आहेत. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी पर्यटकांचीही मोठय़ा प्रमाणात गर्दी होतांना दिसून येत आहे.  येथील वाल्हेरी माता मंदिर परिसरापासून थोडय़ाच अंतरावर असलेल्या द:या-खो:यातून कोसळणारे धबधबे, नागमोडी वाटा, कच्चा रस्ता, पक्षांची किलबिलाट, हिरवा शालू नेसलेल्या टेकडय़ा, असे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना एक मेजवानीच ठरत आहेत. त्यामुळे पर्यटक येथे मोठय़ा प्रमाणात हजेरी लावत आहेत.या पर्यटन स्थळांचा सर्व सुविधा-युक्त विकास व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून पर्यटन प्रेमींकडून होत आहे. या ठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. येथे आलेल्या पर्यटकांना वाहने उभी करण्यापासूनच समस्येला सुरूवात होत आहेत. परिणामी वाल्हेरीच्या विकासासाठी 40 लाखांचा निधी उपलब्ध करूनही येथे येणा:या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी वेळोवेळी मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अधिका:यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.