शहरं
Join us  
Trending Stories
1
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
2
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
3
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
4
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
5
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
6
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
7
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
8
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?
9
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
10
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
11
Sangli: मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
12
मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
13
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
14
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   
15
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
16
Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
17
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या
18
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
19
मायक्रोसॉफ्टची नोकरी गेली, रशियात रस्ता साफसफाई करतोय भारतीय इंजिनिअर; सॅलरी ऐकून थक्क व्हाल
20
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेड्यात पहिल्या दिवशी उसळली भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : श्री दत्त जयंतीनिमित्त सारंगखेडा ता.शहादा येथे भरविण्यात येणाऱ्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी महाराष्टÑासह ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : श्री दत्त जयंतीनिमित्त सारंगखेडा ता.शहादा येथे भरविण्यात येणाऱ्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी महाराष्टÑासह परराज्यातूनही भाविक दाखल झाले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली असून ५० हजारपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले.सारंगखेडा येथील नवसाला पावणाºया एकमखी दत्ताच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. दर्शनासाठी येणाºया भाविकांची गर्दी होऊन अडचण निर्माण होणार नाही, यासाठी यात्रेच्या पहिल्या दिवशी एकमुखी दत्त मंदिर ट्रस्टमार्फत हे मंदिर पहाटे ४ वाजताच उघडण्यात आले. दुपारी १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. या रांगा मंदिर आवारासह सार्वजनिक रस्त्यावरही लागल्याचे दिसून आले. दर्शनानंतर नवसपूर्तीचे उपक्रमही सुरू आहे.सारंगखेडा यात्रा भारतातील सर्वात मोठ्या घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे यात्रेत केवळ महाराष्टÑातीलच नव्हे तर परराज्यातील भाविक देखील आले आहे. त्यात गुजरात, मध्यप्रदेशातील बहुसंख्य भाविकांसह अन्य राज्यातील भाविकांचाही समावेश आहे. त्यामुळे सारंगखेड्यात गर्दी होऊ लागली आहे. यात्रेचे प्रमुख आकर्षण असेल्या चेतक फेस्टीव्हल्साठी मंदिर ट्रस्टींसह ग्रामपंचायत व अन्य यंत्रणांमार्फत तयारी पूर्ण झाली आहे. तर यंदा सारंगखेड्यात मोबाईल डिजीटल मुव्ही थिएटर साकारण्यात आले असून भाविकांना वेगळा अनुभव घेता येणार आहे. या चित्रपट गृहात साधारण १०० प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे.घोडेबाजारात यात्रा सुरु होण्यापूर्वीच सुरुवात झाली असून एकुण २००० घोडे दाखल झाले आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी या बाजारात ३४ लाखाची उलाढाल झाली. त्यात उमद्या घोड्यांना मागणी वाढल्याचे दिसून आले. एक लाखापासून ५० लाखापर्यंत किमतीचे घोडे विक्रीसाठी दाखल करण्यात आले असून ते ारताच्या कानाकोपºयातून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यात्रेत भाविकांसह अश्वशौकिनही आले आहेत.घोडेबाजारात पहिल्या दिवशी मारवाढ जातिचा सर्वात महाग घोडा विकला गेला असून तो पंचकल्याणी गुणांचा असल्याचे सांगण्यात आले. त्याचा मुळमालक हजूर अहमद मन्सूर रा. रिछा बरेली हे असून महाराष्टÑ केसरी कुस्तीपटू अमोल प्रभाकर बुचडे रा. मुळशी (जि.पुणे) यांनी घेतला. यावेळी पोलीस पाटील मदत केंद्राचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक सपकाळे यांच्या हस्ते करण्यातआले. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सह. पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस पाटील संघटनेचे पुरुषोत्तम पाटील यांच्यासह सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील आदी उपस्थित होते.यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या चेतन फेस्टीव्हलसाठी महिनाभरापासून तयारी करण्यात येत होती. ही तयारी आज अंतिम टप्प्यात आली असून गुरुवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते या फेस्टीव्हलचे उद्गाटन करण्यात येणार आहे. फेस्टीव्हलच्या ठिकाणी उभारलेल्या ऐतिहासिक गड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे नव विरांगणाच्या वेशभूषा असलेल्या युवतीच्या संकल्पनेनुसार उद्घाटन होणार आहे.घोडे बाजारएकूण घोड्यांची आवक २०००बुधवारी ६१ घोड्यांची विक्री (उलाढाल-१८ लाख आठ हजार ५०० )आजपर्यंत ८६ घोड्यांची विक्री (उलाढाल- ३४ लाख एक हजार ६००)आजपर्यंत तीन लाख १४ हजाराचा सर्वाधिक महाग घोडा विकला गेला.