सारंगखेड्यात पहिल्या दिवशी उसळली भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:56 IST2019-12-12T11:56:05+5:302019-12-12T11:56:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : श्री दत्त जयंतीनिमित्त सारंगखेडा ता.शहादा येथे भरविण्यात येणाऱ्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी महाराष्टÑासह ...

A crowd of devotees gathered on the first day in Sarangkhed | सारंगखेड्यात पहिल्या दिवशी उसळली भाविकांची गर्दी

सारंगखेड्यात पहिल्या दिवशी उसळली भाविकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : श्री दत्त जयंतीनिमित्त सारंगखेडा ता.शहादा येथे भरविण्यात येणाऱ्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी महाराष्टÑासह परराज्यातूनही भाविक दाखल झाले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली असून ५० हजारपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले.
सारंगखेडा येथील नवसाला पावणाºया एकमखी दत्ताच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. दर्शनासाठी येणाºया भाविकांची गर्दी होऊन अडचण निर्माण होणार नाही, यासाठी यात्रेच्या पहिल्या दिवशी एकमुखी दत्त मंदिर ट्रस्टमार्फत हे मंदिर पहाटे ४ वाजताच उघडण्यात आले. दुपारी १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. या रांगा मंदिर आवारासह सार्वजनिक रस्त्यावरही लागल्याचे दिसून आले. दर्शनानंतर नवसपूर्तीचे उपक्रमही सुरू आहे.
सारंगखेडा यात्रा भारतातील सर्वात मोठ्या घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे यात्रेत केवळ महाराष्टÑातीलच नव्हे तर परराज्यातील भाविक देखील आले आहे. त्यात गुजरात, मध्यप्रदेशातील बहुसंख्य भाविकांसह अन्य राज्यातील भाविकांचाही समावेश आहे. त्यामुळे सारंगखेड्यात गर्दी होऊ लागली आहे. यात्रेचे प्रमुख आकर्षण असेल्या चेतक फेस्टीव्हल्साठी मंदिर ट्रस्टींसह ग्रामपंचायत व अन्य यंत्रणांमार्फत तयारी पूर्ण झाली आहे. तर यंदा सारंगखेड्यात मोबाईल डिजीटल मुव्ही थिएटर साकारण्यात आले असून भाविकांना वेगळा अनुभव घेता येणार आहे. या चित्रपट गृहात साधारण १०० प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे.
घोडेबाजारात यात्रा सुरु होण्यापूर्वीच सुरुवात झाली असून एकुण २००० घोडे दाखल झाले आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी या बाजारात ३४ लाखाची उलाढाल झाली. त्यात उमद्या घोड्यांना मागणी वाढल्याचे दिसून आले. एक लाखापासून ५० लाखापर्यंत किमतीचे घोडे विक्रीसाठी दाखल करण्यात आले असून ते ारताच्या कानाकोपºयातून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यात्रेत भाविकांसह अश्वशौकिनही आले आहेत.
घोडेबाजारात पहिल्या दिवशी मारवाढ जातिचा सर्वात महाग घोडा विकला गेला असून तो पंचकल्याणी गुणांचा असल्याचे सांगण्यात आले. त्याचा मुळमालक हजूर अहमद मन्सूर रा. रिछा बरेली हे असून महाराष्टÑ केसरी कुस्तीपटू अमोल प्रभाकर बुचडे रा. मुळशी (जि.पुणे) यांनी घेतला. यावेळी पोलीस पाटील मदत केंद्राचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक सपकाळे यांच्या हस्ते करण्यातआले. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सह. पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस पाटील संघटनेचे पुरुषोत्तम पाटील यांच्यासह सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील आदी उपस्थित होते.

यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या चेतन फेस्टीव्हलसाठी महिनाभरापासून तयारी करण्यात येत होती. ही तयारी आज अंतिम टप्प्यात आली असून गुरुवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते या फेस्टीव्हलचे उद्गाटन करण्यात येणार आहे. फेस्टीव्हलच्या ठिकाणी उभारलेल्या ऐतिहासिक गड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे नव विरांगणाच्या वेशभूषा असलेल्या युवतीच्या संकल्पनेनुसार उद्घाटन होणार आहे.

घोडे बाजार

एकूण घोड्यांची आवक २०००
बुधवारी ६१ घोड्यांची विक्री (उलाढाल-१८ लाख आठ हजार ५०० )
आजपर्यंत ८६ घोड्यांची विक्री (उलाढाल- ३४ लाख एक हजार ६००)
आजपर्यंत तीन लाख १४ हजाराचा सर्वाधिक महाग घोडा विकला गेला.

Web Title: A crowd of devotees gathered on the first day in Sarangkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.