महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST2021-08-12T04:34:09+5:302021-08-12T04:34:09+5:30
तळोदा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर शहादा-तळोदा रस्त्यावर आमलाड गावाजवळ श्री कनकेश्वर देवस्थान आहे. येथे सात देवीदेवतांची स्थापना केली आहे. ...

महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी
तळोदा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर शहादा-तळोदा रस्त्यावर आमलाड गावाजवळ श्री कनकेश्वर देवस्थान आहे. येथे सात देवीदेवतांची स्थापना केली आहे. संतोषी माता, गजानन महाराज, मारुती, तीन मुखी दत्त, विश्वकर्मा आणि अंबे मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला शेतीशिवार असल्याने निसर्गरम्य वातावरण असते. श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढते. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सकाळी सहा वाजेपासून भाविकांची मोठी गर्दी होती. अभिषेक करण्यासाठी मोठी रांग पाहायला मिळाली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी केळी, साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सदस्य, पदाधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होती.
कनकेश्वरप्रमाणेच तळोदा शहरातील सिद्धेश्वर, खोल महादेव, कृपालेश्वर, चिंचेश्वर, पाताळेश्र्वर, काकेश्वर,रामेश्वर, नीळकंठेश्वर या मंदिरातही भाविकांनी दर्शन घेतले.