हवामान बदलामुळे पिक आली धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 12:17 IST2019-02-18T12:17:43+5:302019-02-18T12:17:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : सततच्या हवामानातील बदलांमुळे तळोदा तालुक्यातील ऊस पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली आह़े ...

हवामान बदलामुळे पिक आली धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : सततच्या हवामानातील बदलांमुळे तळोदा तालुक्यातील ऊस पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली आह़े हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील इतर पिकांना फटका बसत असल्याची स्थिती आह़े
सध्या तळोदा व शहादा तालुक्यातील ऊस पिकांवर पांढरी माशीचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येत आह़े याचा परिणाम उसाच्या उत्पादन क्षमतेवर होईल या भितीपोटी ऊस उत्पादक शेतकरी भितीग्रस्त झाला आह़े पांढरीमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेक:यांनी जैविक व रासायनिक नियंत्रण पध्दतीचा अवलब करुन आपले आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आह़े कधी थंडीची लाट तर कधी ढगाळ हवामानामुळे वातावरणात वारंवार बदल घडून येत आहेत़ वातावरणातील बदलांमुळे जैविक किडींचा प्रादुर्भाव वाढत आह़े त्याचा फटका शहादा तळोदा तालुक्यातील ऊस पिकावर होऊन पांढ:या माशीचा प्रादुर्भावामुळे ऊस पिक मोठय़ा प्रमाणावर नुसासानीची शक्यता वर्तविण्यात येत आह़े पांढ:या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऊस उत्पादक शेतक:यांनी जैविक व रासायनिक नियंत्रण पध्दतीचा अवलंब करणे फायदेशिर ठरणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आह़े जैविक पध्दतीने किड नियंत्रण करण्यासाठी ‘क्रायसोपा’ अंडीपूंज दोन हजार प्रती एकरी वापरावी असा सल्ला देण्यात येत आह़े
सध्या बहुतेक ठिकाणी ऊस तोडणीवर आलेला आह़े तर काही ठिकाणी उसाची वाढ होत आह़े आधीच अल्प पावसामुळे उसासह इतर रब्बी पिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक आह़े पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटल्याने शेतक:यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यातच आता बदलत्या हवामानाचा फटका उसाला बसत असल्याने तोडणीवर आलेला उसाचा दर्जा खालावत असल्याने त्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याचे दिसून येत आह़े किड नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून शेतक:यांना मार्गदर्शन करण्यात येत आह़े
गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील वातावरणात वेगाने बदल होताना दिसून येत आह़े मध्येच थंडी तर माध्येच उकाडा जाणवत आह़े आता तर गेल्या चार दिवसांपासून विविध ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आह़े ढगाळ हवामानामुळे याचा फटका रब्बी पिकांवर बसण्याचा धोका आह़े त्याच प्रमाणे हरभरा पिकावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आह़े पुढील काही दिवस हेच वातावरण कायम राहिले तर मात्र पिकांना मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण होणार आह़े दरम्यान, किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतक:यांनी एक वेळा किटक नाशक फवारणी करावी असा सल्ला देण्यात येत आह़े