प्रकाशा येथे शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:42+5:302021-09-04T04:36:42+5:30
मेळाव्याला आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जि. प. चे माजी सदस्य रामचंद्र पाटील, वि. का. सोसायटीचे चेअरमन हरी पाटील, तंटामुक्त ...

प्रकाशा येथे शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावा
मेळाव्याला आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जि. प. चे माजी सदस्य रामचंद्र पाटील, वि. का. सोसायटीचे चेअरमन हरी पाटील, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष किशोर चौधरी, लीड बँकेचे व्यवस्थापक देशपांडे, सहायक निबंधक नीरज चौधरी, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह प्रकाशा ग्रामपंचायत, कृषी विभाग, महसूल विभाग, सहकार विभाग, प्रकाश येथील दोन्ही राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील गावांमधील शेतकरी उपस्थित होते.
आमदार डॉ. विजयकुमार गावीत म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र प्रत्यक्षात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. ही गोष्ट खासदार डॉ. हीना गावीत यांना दिशा समितीच्या बैठकीत निदर्शनास आली. म्हणून त्यांनी ठरवले की, गरजू व ज्यांचे सातबारे कोरे आहे अशा शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ द्यावा. म्हणून गावोगावी शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार प्रकाशा येथे हा मेळावा घेण्यात आला. जे शेतकरी पात्र आहेत त्यातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही. किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा लोन, पशुपालन, मत्स्य व्यवसाय व इतर कर्जाचा लाभ घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी त्रुटी असतील त्या बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूर कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.