जिल्ह्यात पीक कर्ज वाटप मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:40+5:302021-08-25T04:35:40+5:30

शहादा तालुक्यातील सारंगखेडा, प्रकाशा, म्हसावद, पाडळदा येथे तीन रोजी, चार रोजी रोजी वडाळी, मंदाणे, ब्राह्मणपुरी, बामखेडा, असलोद, ...

Crop loan distribution meet in the district | जिल्ह्यात पीक कर्ज वाटप मेळावा

जिल्ह्यात पीक कर्ज वाटप मेळावा

शहादा तालुक्यातील सारंगखेडा, प्रकाशा, म्हसावद, पाडळदा येथे तीन रोजी, चार रोजी रोजी वडाळी, मंदाणे, ब्राह्मणपुरी, बामखेडा, असलोद, सात सप्टेंबर रोजी तळोदा तालुक्यातील मोड, बोरद, प्रतापपूर, सोमावल, आठ सप्टेंबर रोजी नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी, रनाळा, शनिमांडळ, कोपर्ली, नऊ सप्टेंबर रोजी नंदुरबार तालुक्यातील आष्टे, धानोरा येथे आणि त्याच दिवशी नवापूर तालुक्यातील खांडबारा व श्रावणी येथे तर २० सप्टेंबर २०२१ रोजी नवापूर तालुक्यातील विसरवाडी, चिंचपाडा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल.

अक्कलकुवा तालुक्यातील खापर, वाण्याविहीर, कोराई, अक्कलकुवा येथे २१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर रोजी अक्राणी तालुक्यातील राजबर्डी, मांडवी, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे पीक कर्ज मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या पीक कर्ज मेळाव्यात पीक कर्ज, पशुसंवर्धन आणि मस्त्य व्यवसायासाठी खेळते भांडवल पात्रतेनुसार मंजूर करण्यात येईल. मेळाव्यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, बँक प्रतिनिधी, क्षेत्रीय अधिकारी, सोसायटी अधिकारी, पशुधन अधिकारी तसेच मत्स्य विकास अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले नसेल अशा शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, फेरफार नक्कल, पीकपेरा प्रमाणपत्र, बागायती जमीन असल्यास सातबारामध्ये नोंद इत्यादी कागदपत्रांसह पीक कर्ज मेळाव्याच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक जयंत देशपाडे यांनी केले आहे.

Web Title: Crop loan distribution meet in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.