आष्टे येथे पीक कर्ज वाटप मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST2021-09-10T04:36:54+5:302021-09-10T04:36:54+5:30
मेळाव्याची सुरुवात डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली. आमदार डॉ. गावीत व महेंद्र ...

आष्टे येथे पीक कर्ज वाटप मेळावा
मेळाव्याची सुरुवात डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली. आमदार डॉ. गावीत व महेंद्र पटेल यांचा वसंत रामचंद्र शेवाळे तालुका उपाध्यक्ष भा.ज.पा कैलास काळे, विजय शेवाळे, तुकाराम पाटील, निंबा हेमाडे, दिनेश शेवाळे, छोटू गाठे, भूषण हेमाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या वेळी आमदार डॉ. विजयकुमार गावीत म्हणाले की, शेतकऱ्यांना केंद्र सरकारमार्फत होणारा वित्तपुरवठा सुलभ पद्धतीने व्हावा यासाठी आपल्या नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉ. हीना गावीत यांच्या प्रेरणेने बँकांशी निगडित सर्व कामे एकाच ठिकाणी होण्यासाठी या मेळाव्याचे नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहेत. यातून सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्ज व शेतीपूरक व्यवसायासाठी करण्यात येणारा वित्तपुरवठा तसेच मुद्रा लोन, विविध योजनांसाठी महिलांनी जनधन खाते या मेळाव्यात आपले प्रस्ताव दाखल करावे, असे आव्हान केले.
मेळाव्याच्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी तसेच इतर सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व राष्ट्रीयीकृत बँकेच्या परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावांचे तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शाखाधिकारी सेंट्रल बँक, जिल्हा बँक गटसचिव उपस्थित होते. मेळाव्यासाठी आष्टे, अजेपूर, घोगळगाव, अंबापूर, सुतारे, हरिपूर, ठाणेपाडा, गंगापूर, ओझर्दे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.