शहादा तालुक्यात वादळीवाऱ्याने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:52 IST2020-07-31T12:50:48+5:302020-07-31T12:52:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गोमाई नदीला पुर आल्याने सकाळपासून नागरिकांनी पाडळदा पुलावर गर्दी केली होती़ यंदाच्या पावसाळ्यात ...

शहादा तालुक्यात वादळीवाऱ्याने पिकांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील गोमाई नदीला पुर आल्याने सकाळपासून नागरिकांनी पाडळदा पुलावर गर्दी केली होती़ यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा गोमाई नदीला पूर आला आहे़ यामुळे तालुक्यातील कूपनलिका व विंधन विहिरींची पातळी वाढणार आहे़
शहादा शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यापासून समाधानकारक पाऊस झाल्याने नदी-नाले वाहत आहेत़ दरा मध्यम प्रकल्पासह इतर प्रकल्पांमध्ये पाणी साठा झाला आहे़ पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ यातून कापूस सोयाबीन या पिकांना जीवदान मिळाले आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सुसरी नदीला पूर आला आहे़ दरम्यान गुरुवारी पहाटे झालेल्या पावसामुळे गोमाई नदीला पूर आला होता़ तिखोरा पुलावरून नदीतील पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले़ पुरात वाहून आलेली लाकडे गोळा करताना युवक याठिकाणी दिसून येत आहे़ बुधवारी रात्री उशिरापर्यंत गोमाई नदीत काही महिला भाविकांकडून दशा मातेचे विसर्जन करण्यात येत होते़
बामखेडा परिसरात वादळी वारे
बामखेडा परिसरात रात्री ११ वाजता वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ जून महिन्यात विश्रांतीनंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला होता. परंतु बुधवारी मध्यरात्री सलग १ तास वादळी वाºयासह बामखेडा, वडाळी, खैरवे, भडगाव मातकुट, बोराळा जयनगर, कोंडावळ, फेस, दोंदवाडा, हिंगणी, तोरखेडा आणि काकर्दा या गावांमध्ये केळी, पपई, मिरची, कापूस आदी पिकांचे नुकसान झाले आहे़ वादळ वाºयामुळे पिके आडवी पडली होती़ यात अर्जुन चौधरी, मनोज चौधरी, वसंत पटेल, यादव पाटील, रविंद्र रत्नपारखी यांच्या पपई आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे़ कृषी विभागाने या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी आहे़ बामखेडा येथील पपई उत्पादक शेतकºयाने शेतात साचलेले पाणी मोटारद्वारे उपसून बाहेर काढले होते़
बामखेडा परिसरात वादळी वारे
सारंगंखेडा आणि परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने शेतामध्ये पाणी साचले आहे़ यामुळे काही पिके पाण्याखाली गेली आहेत़ पाणी साचून राहिल्यास पिके वाया जाण्याची शक्यता आहे़ सपाटीवरच्या शिवारातील कापूस, पपई, मूग, सोयाबीन, तूर, उडीद आदी पिके पाण्याखाली गेली आहेत़ अती पाण्यामुळे पिके वाया जावू नयेत यासाठी शेतकºयांकडून पंप लावून शेतातून पाणी काढण्याचे काम गुरूवारी सकाळी सुरू करण्यात आले आहे़ सारंगखेडा परिसरातील पपईच्या शेतातून सकाळी डिझेल पंपाच्या साह्याने अति पपई वाया जावू नये यासाठी शेतकरी कसरत करत असल्याचे दिसून आले़ शेतातील पाणी नाल्यात टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते़ या पावसामुळे दिलासा मिळाला तरी नुकसानीमुळे शेतकºयांच्या समाधानावर विरजण पडले आहे़ परिसरातील बºयाच शेतांमध्ये कापसाला बोेंडे फूटू लागल्याचे दिसून आले होते़ या शेतांमध्येही दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे दिसून आले़