विवाहिता आत्महत्या प्रकरणी तलावडीच्या तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:20 IST2018-04-06T12:20:18+5:302018-04-06T12:20:18+5:30

CRIMINAL TRIAL | विवाहिता आत्महत्या प्रकरणी तलावडीच्या तिघांवर गुन्हा

विवाहिता आत्महत्या प्रकरणी तलावडीच्या तिघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तलावडी, ता.शहादा येथील तिघांविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिताबाई प्रकाश पावरा रा.तलावडी असे मयत महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, सुनिताबाई पावरा या महिलेस गेल्या एक वर्षापासून सासरची मंडळी त्रास देत होती. शाररिक व मानसिक छळ सुरू होता. अखेर छळाला कंटाळून तीने 17 मार्च रोजी घरातच गळफास घेतला. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतांना 21 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. 
याबाबत आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु सुनिताबाई यांच्या माहेरच्या लोकांनी संशय घेतल्याने व आत्महत्येस सासरचीच मंडळी जबाबदार असल्याची फिर्याद अजित मंगाराम पावरा, रा.तुळाजा, ता.तळोदा यांनी दिली. त्यावरून प्रकाशा लाश्या पावरा, लाश्या मानसिंग पावरा, सायंकीबाई लाश्या पावरा सर्व रा.तलावडी, ता.शहादा    यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार दाभाडे करीत आहे.

Web Title: CRIMINAL TRIAL