विद्याथ्र्याच्या मोर्चा प्रकरणी दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:27 IST2019-11-17T14:27:44+5:302019-11-17T14:27:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मनाई आदेश असतांनाही बालदिनी विद्याथ्र्याचा मोर्चा काढून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नर्मदा नवनिर्माणच्या दोन कार्यकत्र्यावर ...

विद्याथ्र्याच्या मोर्चा प्रकरणी दोघांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मनाई आदेश असतांनाही बालदिनी विद्याथ्र्याचा मोर्चा काढून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नर्मदा नवनिर्माणच्या दोन कार्यकत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नर्मदा काठावरील जीवन शाळांच्या विद्याथ्र्याच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बालदिनी नर्मदा नवनिर्माण आंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्यात मनाई आदेश असतांनाही हा मोर्चा काढल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. जिल्ह्यात 20 नोव्हेंबर्पयत कलम 144 लागू आहे. मोर्चा, मिरवणुका, आंदोलने यांच्यासाठी पूर्व परवाणगी घेणे आवश्यक आहे. असे असतांना नर्मदा नवनिर्माणने याबाबत कुठलीही परवाणगी घेतली नाही.
याबाबत जमादार गणपत भिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लतिका राजपूत व चेतन साळवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार ठाकरे करीत आहे.