मास्क अभावी फिरणाऱ्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:29 IST2020-04-14T12:29:09+5:302020-04-14T12:29:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील ईलाही चौकात मास्क न लावता फिरणाºयाला पोलीस कर्मचाºयाने अटकाव केल्यानंतर संशयिताने पोलीसालाच धक्का ...

Crimes against those who want to mask | मास्क अभावी फिरणाऱ्यांवर गुन्हे

मास्क अभावी फिरणाऱ्यांवर गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील ईलाही चौकात मास्क न लावता फिरणाºयाला पोलीस कर्मचाºयाने अटकाव केल्यानंतर संशयिताने पोलीसालाच धक्का देत कायद्याचे उल्लंघन केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला होता़ याप्रकरणी रविवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़
ईलाही चौकात संचारबंदी काळात कर्तव्य निभावणारे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत बारी हे शनिवारी सायंकाळी पेट्रोलिंग करत होते़ यावेळी त्यांना एक जण विनाकारण तोंडाला मास्क न लावताच या भागात फिरत असल्याचे दिसून आले़ त्यांनी त्यास विचारणा केली असता संशयित बबलू काल्या नामक युवकाने पोलीस कॉन्स्टेबलला धक्का देत शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणला़ घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजल्यानंतर कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत बारी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन बबलू काल्या याच्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत गुन्हा दाखल आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे करत आहेत़
रविवारी सायंकाळी शहरातील रज्जाक पार्क भागात आरीफ अली सय्यद उर्फ आरीफ दातºया हा पोलीसांना मास्कविना फिरत अल्याचे दिसून आला़ त्याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल अनिल बडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी करत आहेत़
नवापुरातही एकावर कारवाई
नवापुर शहरातील रंगावली नदी किनारी बाजार चौकात तोंडाला मास्क न लावता कांदे बटाटे विक्री करताना अश्फाक मुश्ताक अत्तर हा पालिकेच्या पथकाला आढळून आला़ सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता निष्काळजीपणा करत असल्याने त्याच्याविरोधात पालिका कर्मचारी मनोजकुमार कांतीलाल पाटील यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे़

Web Title: Crimes against those who want to mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.