पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दुचाकीस्वार दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 21:27 IST2020-05-09T21:25:25+5:302020-05-09T21:27:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथील प्रतिबंधीत क्षेत्रात जाण्याच्या वादातून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला ...

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दुचाकीस्वार दोघांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा येथील प्रतिबंधीत क्षेत्रात जाण्याच्या वादातून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण आनंदराव पाटील, रा.शांतीनगर, शहादा व गणेश प्रभाकर पगारे, रा.नांदगाव असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनुसार, शहादा येथील स्टेट बँक चौकात बॅरिकेटींग लावण्यात आले आहे. या भागात जाण्यासाठी नारायण पाटील व गणेश पाटील हे दुचाकीवर गेले. त्यांनी आपली दुचाकी जबरीने बॅरीकेटींगच्या आत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना अडविणारे पोलीस कर्मचारी दादाभाई मगरे व स्वयंसेवक सागर मोरे यांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. नंतर दोघांशी त्यांनी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणला.
याबाबत फौजदार योगिता पाटील यांनी फिर्याद दिल्याने नारायण पाटील व गणेश पगारे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणने व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. तपास फौजदार विक्रांत कचरे करीत आहे.