कोयलीविहीर येथील युवतीच्या अपहरणप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा
By Admin | Updated: July 3, 2017 12:14 IST2017-07-03T12:14:01+5:302017-07-03T12:14:01+5:30
अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर येथून अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

कोयलीविहीर येथील युवतीच्या अपहरणप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार ,दि.3 - अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर येथून अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े डॉक्टरने युवतीस फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आह़े
लालपूर ता़ अक्कलकुवा येथील 17 वर्षीय युवतीचे 27 रोजी सकाळी 11़30 वाजता कोयलीविहीर येथील डॉ रूपेश सुरेशराव कानडे याने अपहरण करून घरात लपवून ठेवल्याची तक्रार युवतीच्या आईने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिली होती़ त्यानुसार पोलिसांकडून चार दिवसांपासून तपास सुरू होता़ संबंधित युवती ही डॉ़ कानडे याच्या कोयलीविहीर येथील घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी भेट दिल्यावर युवती त्याठिकाणी आढळून आली़ याबाबत युवतीच्या आईने शनिवारी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून डॉ़ कानडे याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आह़े गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी डॉ़ रूपेश कानडे यास ताब्यात घेतले आह़े डॉ़ कानडे हा मूळ तळोदा येथील रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आह़े