मास्कचा वापर टाळल्याने गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST2021-03-17T04:31:24+5:302021-03-17T04:31:24+5:30
मोलगी येथे दोघांवर पोलिसांची कारवाई नंदुरबार : मोलगी ता.अक्कलकुवा येथे मास्कचा वापर मोचाऱ्या वेस्ता पाडवी रा.पाटीलपाडा व आपसिंग ...

मास्कचा वापर टाळल्याने गुन्हा
मोलगी येथे दोघांवर पोलिसांची कारवाई
नंदुरबार : मोलगी ता.अक्कलकुवा येथे मास्कचा वापर मोचाऱ्या वेस्ता पाडवी रा.पाटीलपाडा व आपसिंग बद्या तडवी रा.केवडी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. दोघांविरोधात पोलीस काॅन्स्टेबल देवानंद कोळी यांच्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर शहरात बेशिस्तांची धावपळ
नंदुरबार : मास्कचा वापर न करता, बाजारात हिंडणाऱ्यांवर नवापुरात कारवाई सुरू आहे. रविवारी शहरात बस स्थानक परिसरात विनामास्क सुनील किस्माभाई गामीत रा.बडपाडा ता.उच्छल व अल्ताफ नासीर अहमद रा.सोनगढ यांच्यावर कारवाई करण्यात आली. दोघांविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियमांचा भंग केल्याने गुन्हे दाखल
नंदुरबार : जिल्ह्यात रविवारी धडगाव पोलीस ठाण्यांतर्गत दोन, अक्कलकुवा, तळोदा, विसरवाडी, उपनगर, नंदुरबार शहर व तालुका पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी दोघांवर विनामास्कप्रकरणी कारवाई झाली. सारंगखेडा पोलीस ठाण्यांतर्गत एकावर कारवाई झाली. त्यांच्यावर या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.