पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 12:56 IST2019-02-20T12:56:25+5:302019-02-20T12:56:32+5:30
शहर पोलीस ठाणे : मयताच्या आईची फिर्याद

पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा
नंदुरबार : पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह मयताच्या सासूविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ 14 फेब्रुवारी रोजी आत्महत्येची घटना घडली होती़
मेहतर वस्तीतील अमरदिप मनोहर चावरिया (35) यांनी 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती़ पत्नी रेणू अमरदिप चावरिया व सासू राजबिरी राजू बेटनवाल दोन्ही रा़ रो हाऊस हरीकुंज नाशिक हे वारंवार भांडण करुन अपमानित करत असल्याने मानसिक त्रासाला कंटाळून अमरदिप यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटूंबियांचे म्हणणे होत़े यानुसार चंपाबाई मनोहर चावरिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रेणू चावरिया व राजबिरी बेटनवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता पाटील ह्या करत आहेत़