Crime against two for power theft | वीज चोरीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
वीज चोरीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुुरबार : तळवे, ता.तळोदा येथील दोघांविरुद्ध वीज चोरीप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळवे येथील विश्वास मोहनलाल चौधरी यांनी १,२२० युनिट वीजेची चोरी केली. तर गावातीलच भटू चिंधा कोळी यांनी ६०५ युनिट विजेची चोरी केली. वीज कंपनीच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकून तपासणी केली असता ही चोरी उघड झाली. वीज कंपनी अधिकारी गजानन वसंतराव कोष्टी यांनी फिर्याद दिल्याने भारतीय वीज अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अक्कलकुवा पोलीस करीत आहे.

Web Title: Crime against two for power theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.