अवैध मांस विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 21:50 IST2020-07-14T21:50:05+5:302020-07-14T21:50:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील अलीसाब मोहल्ला परिसरात विनापरवाना गोमांस विक्री प्रकरणी पोलीसांनी तिघांवर कारवाई केली़ पोलीसांनी संशयितांकडून ...

अवैध मांस विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील अलीसाब मोहल्ला परिसरात विनापरवाना गोमांस विक्री प्रकरणी पोलीसांनी तिघांवर कारवाई केली़ पोलीसांनी संशयितांकडून १ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
अलीसाब मोहल्ला भागातील आशियाना बिल्डींग जवळ तिघे गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता शेख जुनैद शेख नुरु कुरेशी, अनिस खान युरान खान कुरेशी व शेख रोशन शेख मेहबूब हे तिघेही एमएच ०४ एचडी २०२८ या वाहनात मांस भरताना आढळून आले़ त्यांच्याकडून ७७ हजार रुपयांचे ५५० किलो मांस व १ लाख ९० हजार रूपये किमतीचे चारचाकी वाहन असा मुद्देमाल मिळून आला़
याप्रकरणी पोलीस शिपाई इम्रान खाटीक यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत़
शासनाकडून गुरे कत्तलीस मनाई आहे़ यातून तिघांकडे मास्कसह इतर कोणत्याही उपाययोजना न आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़