ग्रामपंचायतीत 61 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:08 IST2019-06-12T12:08:14+5:302019-06-12T12:08:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बंधारे ग्रामपंचायतीत अपहार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संशयितांमध्ये सरपंच ...

ग्रामपंचायतीत 61 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बंधारे ग्रामपंचायतीत अपहार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संशयितांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकासह आणखी दोघांचा समावेश आह़े चौघांनी मिळून 61 लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आह़े
बंधारे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजनांसाठी आलेल्या निधीचा वापर न करता परस्पर हडप केल्याप्रकरणी नवापुर न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होत़े सरपंच हेमा हरीश्चंद्र पाडवी, ग्रामसेवक रघुनाथ शिवाजी गावीत, सरला कृष्णा वसावे आणि नानसिंग अजनसिंग वसावे सर्व रा़ बंधारे यांनी 1 नोव्हेंबर 2011 ते 26 जुलै 2018 यादरम्यान शासनाकडून बंधारे ग्रामपंचायतीसाठी आलेल्या 61 लाख 83 हजार 204 रुपये धनादेशाद्वारे वेळावेळी काढून घेतल्याचा तक्रारअर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता़ बंधारे ग्रामपंचायतीचे खाते असलेल्या नवापुर सेंट्रल बँक आणि युनियन बँक चिंचपाडा येथून हे पैसे काढण्यात आल्याचे देण्यात आलेल्या अर्जात म्हटले होत़े त्यावर कारवाई करत न्यायालयाने सोमवारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होत़े गेल्या काही महिन्यांपासून चौघांनी अपहार केल्याबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता़ याबाबत नरपत गोविंद वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच हेमा पाडवी, ग्रामसेवक शिवाजी गावीत, सरला वसावे आणि नानसिंग वसावे यांच्याविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक डी़एस़शिंपी करत आहेत़