मोटारसायकल अपघातातील मयत चालकाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:08 IST2019-09-17T12:08:35+5:302019-09-17T12:08:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील पटेलवाडी जवळ जुलै महिन्यात झालेल्या मोटरसायकल अपघात प्रकरणी पोलीसांनी मयत चालकाविरोधात गुन्हा दाखल ...

मोटारसायकल अपघातातील मयत चालकाविरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील पटेलवाडी जवळ जुलै महिन्यात झालेल्या मोटरसायकल अपघात प्रकरणी पोलीसांनी मयत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आह़े पोलीस तपासानंतर 15 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला़
26 जुलै रोजी विशाल धनीलाल पाडवी (20) रा़ वाघाळे ता़ नंदुरबार हा पटेलवाडी परिसरातील विठ्ठल मंदिराजवळून मोटारसायकलने भरधाव वेगात जात असताना ती घसरुन अपघात झाला होता़ यात विशाल पाडवी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े तेथून पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथे दाखल केले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना त्याचा 4 ऑगस्ट रोजी उपचार सुरु असताना मृत्यू झाला़
याबाबत तुषार दादाजी चौरे याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मयत विशाल पाडवी याच्याविरोधात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत़