बांधकाम अभियंता व ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:49 PM2020-08-11T12:49:37+5:302020-08-11T12:49:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खाजगी ठेकेदाराकडून आठ लाखाचे बील काढण्यासाठी २४ हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शहादा पंचायत समितीचे ...

Crime against construction engineer and gram sevak | बांधकाम अभियंता व ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा

बांधकाम अभियंता व ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खाजगी ठेकेदाराकडून आठ लाखाचे बील काढण्यासाठी २४ हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शहादा पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता व टेंभली, ता.शहादाचे ग्रामसेवक यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात देखील पंचायत समितीचे बांधकाम अभियंता लाचप्रकरणी जाळ्यात अडकले होते.
राजेश लक्ष्मण पाटील, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती, शहादा व प्रविणसिंह कोमलसिंह गिरासे, ग्रामसेवक, गृप ग्रामपंचायत टेंभली, ता.शहादा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खाजगी ठेकेदार यांनी २०१८-१९ या कालावधीत टेंभली ग्रुप ग्रामपंचायतंतर्गत होळ गुजरी ग्रामपंचायतीचा वस्ती रस्ता काँक्रीटीकरणाचे काम जनसुविधा २५२५ योजनेअंतर्गत करण्यात आले. त्याची निविदा नऊ लाख ९९ हजार रुपये इतकी होती.
नोंदणीकृत एजन्सीने हे काम घेऊन सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून तक्रारदार यांना दिले होते व तसा करारनामा करण्यात आला होता. ते काम डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण झाल्याने टेंभली ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेने आठ लाख पाच हजार २०० रुपये रक्कमेचा चेक मार्च महिन्यात वर्ग केला. परंतु रक्कम न मिळाल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी ठेकेदार राजेश पाटील व ग्रामसेवक प्रविणसिंह गिरासे यांना विचारले असता राजेश पाटील यांनी ठकेदाराकडे २४ हजार रुपये लाचेची मागणी केली.
ग्रामसेवक यांनी त्यास प्रोत्साहन दिले. ८ आॅगस्ट रोजी हा प्रकार पंचायत समितीत घडला. तक्रारदार आणि पंचासमक्ष प्रकार घडल्याने १० आॅगस्ट रोजी याबाबत फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अभियंता राजेश पाटील व ग्रामसेवक प्रविणसिंह गिरासे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शिरिष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक जयलपाल अहिरराव, हवालदार उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, पोलीस नाईक दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत तीन महिन्यात तीन अभियंते लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

Web Title: Crime against construction engineer and gram sevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.