दुर्गम भागातील गौ:या येथून 14 दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:54 IST2019-07-29T12:44:11+5:302019-07-29T12:54:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील गौ:या येथील एकाकडून एलसीबीच्या पथकाने चोरीच्या तब्बल 14 दुचाकी ताब्यात ...

Cow in remote areas: 14 bicycles seized from here | दुर्गम भागातील गौ:या येथून 14 दुचाकी जप्त

दुर्गम भागातील गौ:या येथून 14 दुचाकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील गौ:या येथील एकाकडून एलसीबीच्या पथकाने चोरीच्या तब्बल 14 दुचाकी ताब्यात घेतल्या. सर्व दुचाकी या चा:याच्या गंजीत लपवून ठेवलेल्या होत्या. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
नंदुरबारसह जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर दुचाकी चोरीस जात आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ही बाब लक्षात घेता स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेने चोरटय़ांचा माग काढण्यासाठी तपास सुरू केला. पोलीस निरिक्षक किशोर नवले यांना दुचाकी चोरी करणारी अक्कलकुवा व तळोदा येथील संशयीत चोरलेल्या दुचाकी या धडगाव येथील एकाला कमी किंमतीत विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पथक गौ:या गावाला धडकले. तेथे भरत वण्या पराडके या संशयीताच्या घरावर सतत चार दिवस वेशांतर करून पाळत ठेवून होते. त्यांच्या घरी येणा:या-जाणा:या लोकांवर लक्ष ठेवून होते. याच दरम्यान 27 जुलै रोजी त्यांच्याकडे नंबर नसलेल्या दोन दुचाकींवर चारजण आले. याचवेळी पथकाने अचानक धाड टाकली. भरत वण्या पराडके रा.गौ:या, भगतसिंग उर्फ बंडय़ा नरपत वसावे रा.वेली, ता.अक्कलकुवा, जगन पारशी वळवी रा.सल्लीबार, ता.अक्कलकुवा, कृष्णा जाण्या पाडवी रा.जमाना,ता.अक्कलकुवा व पुन्या तारक्या वसावे, रा.लक्कडकोट, ता.तळोदा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी आणलेल्या दोन्ही मोटरसायकली चोरीच्या असल्याचे सांगून भरत पराडके यास विकत असल्याचे सांगितले.  
भरत पराडके याच्या घराच्या आजूबाजूस शोध घेतला असता चा:याच्या गंजीत 12 दुचाकी व चौघांनी आणलेल्या दोन अशा 14 दुचाकी मिळून आल्या. त्यांची     एकुण किंमत तीन लाख 12 हजार 180 रुपये इतकी आहे. नंदुरबारसह शहादा, म्हसावद, अक्कलकुवा, तळोदा धडगाव या भागातून  चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील काही मोटारसायकली उत्तर  प्रदेशातील फरिदाबाद व नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील देखील आहेत. अनेक दुचाकींच्या चेसीस नंबरवर ग्राईंडरने खोडल्याने नंबर कळत नाही. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार दिपक मोरे, विनोद जाधव, विकास अजगे, राकेश मोरे, महेंद्र सोनवणे, विजय ढिवरे, आनंदा मराठे, अभय राजपूत यांनी केली. पोलीस अधीक्षकांनी पथकाला रोख बक्षीस जाहीर केले. 

याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले, नागरिकांनी केवळ दुचाकीच्या हॅण्डल लॉकवर अवलंबून न राहता रात्रीच्या वेळी साखळदंड बांधावा. शिवाय वाहनाला हात लावल्यास किंवा हॅण्डलशी छेडछाड केल्यास हॉर्न वाजत असल्याचे उपकरणे बाजारात सहज उपलब्ध आहेत. त्यांचाही वापर नागरिकांनी करावा. कुणी कागदपत्रे नसलेल्या व कमी किंमतीतील दुचाकी विकत असतील तर लागलीच जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असेही आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे. 
 

Web Title: Cow in remote areas: 14 bicycles seized from here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.