विखरण येथे कोविड लसीकरण उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:32 IST2021-04-23T04:32:53+5:302021-04-23T04:32:53+5:30

या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शेखर रौंदळ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, माध्यमिक ...

Covid vaccination festival at scattering | विखरण येथे कोविड लसीकरण उत्सव

विखरण येथे कोविड लसीकरण उत्सव

या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शेखर रौंदळ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, केंद्रप्रमुख संजय कुवर, विखरण ग्रामपंचायत सरपंच छायाबाई बापू पाटील, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, ग्रामसेवक एस.डी. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज कदम, डॉ. मनिष नांद्रे, डॉ. हेमांगी आगळे आदी उपस्थित होते. लसीकरण उद्घाटन सोहळ्यानंतर वय वर्षे ४५ व त्यापुढील नोंदणीकृत नागरिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी लसीकरण काळाची गरज, मृत्यूचे धोके टाळण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व आपल्या मार्गदर्शनातून मांडले. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शेखर रौंदळ यांनी लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या संपन्न होत असल्यामुळे ग्रामपंचायत विखरण व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी विखरण येथील लसीकरण नोंदणी व स्वच्छता सर्वेक्षण याविषयीची माहिती सांगितली. गावातील नागरिकांनी कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक बाबींचे अनुपालन करून उत्स्फूर्तपणे लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवला. प्रत्यक्ष लसीकरणकामी रेखा बाविस्कर, जयश्री कानडे, कल्पना गोसावी, आरोग्यसेवक पी.जी. ब्राह्मणे, हिना वळवी, सरला अहिरे यांनी कामकाज पाहिले. लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विखरण येथील उपसरपंच सुनीता पवार, सदस्य निर्मला मराठे, ईश्वर मराठे, सुमन मराठे, दिलीप पाटील, भारती पाटील, धर्मा भिल, उखडीबाई भिल, पोलीसपाटील दीपमाला पाटील, रोटेरियन प्रा. निशिकांत शिंपी, राहुल पाटील, किशोर साळुंके, रोहिदास मराठे, बापू पाटील, भास्कर पाटील, जलसुरक्षक महादु भिल, विलास भिल, रवींद्र पाटील, सुरेश मराठे, अंगणवाडी सेविका अनिता पाटील, प्रमिला पाटील, प्रतिभा सोनी, सुरेखा पाटील, आशा वर्कर माधुरी पाटील, रत्नाबाई पाटील तसेच देवरे विद्यालयाचे उपशिक्षक के.पी. देवरे, एम.डी. नेरकर, वाय.डी. बागुल, लिपिक आर.एम. पाटील, शिपाई एस.जी. पाटील, जि. प. शिक्षक एस.एस. बोरसे, जयश्री सैंदाणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उपशिक्षक डी.बी. भारती यांनी, तर लसीकरणाचे नियोजन व उपस्थितांचे आभार देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंखे यांनी मानले.

Web Title: Covid vaccination festival at scattering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.