कोविड कोच उपचारासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST2021-04-17T04:30:09+5:302021-04-17T04:30:09+5:30

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय रेल्वे व आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णांना उपचारासाठी रेल्वेचा कोविड कोच ...

Covid coach ready for treatment | कोविड कोच उपचारासाठी सज्ज

कोविड कोच उपचारासाठी सज्ज

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय रेल्वे व आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णांना उपचारासाठी रेल्वेचा कोविड कोच पाठविण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार खा. डाॅ. हीना गावीत यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून नंदुरबार जिल्ह्यासाठी कोच मागितला होता. त्यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत रेल्वेने नंदुरबारसाठी ११ एप्रिल रोजी हा कोच पाठविला होता. नंदुरबार रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक तीनवर तो कार्यान्वित करण्यात आला आहे. या कोचची जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड, खा. डाॅ. हीना गावीत, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रघुनाथ भोये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. विशेषत: हा कोच एसी नसल्याने तेथील तापमानाची अडचण समोर आली होती. याशिवाय इतर सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यानुसार रेल्वे कोचच्या छतावर गोणपाट टाकण्यात आले असून संपूर्ण कोचवर मंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय डेझर्ट कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठिकाणी परिचारिका व डाॅक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून प्रशासन या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत होते. या सुविधा आता झाल्या असल्याने येथे रुग्णांवर आता उपचार करणे शक्य होणार आहे.

कोचमधील व्यवस्था

या रेल्वेमध्ये एकूण २० डबे असून एका कोचमध्ये साधारणत: १६ ते २४ बेड राहणार आहेत. तेथे मच्छरदाणीसह बाथरूम व दोन बाॅयो टाॅयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथेच दोन ऑक्सिजनचे सिलिंडर राहणार आहेत.

या कोचच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Covid coach ready for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.