नवापुरच्या १२ जणांना न्यायालयाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:47 IST2020-04-29T14:47:13+5:302020-04-29T14:47:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन सुरु असताना सोलापूर येथून नवापुरात आलेल्या १२ जणांसह बंदी असताना तंबाकूजन्य पदार्थ विक्री ...

Court fines 12 in Navapur | नवापुरच्या १२ जणांना न्यायालयाचा दंड

नवापुरच्या १२ जणांना न्यायालयाचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊन सुरु असताना सोलापूर येथून नवापुरात आलेल्या १२ जणांसह बंदी असताना तंबाकूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एकास न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली आहे़ निकालादरम्यान न्यायालयाने संसर्ग कालावधीत झालेले नियमांचे उल्लंघन हे गंभीर असून जास्तीत जास्त शिक्षद्वारे दंडनीय ठरवणे हे कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे़
२ एप्रिल रोजी सोलापूर येथून वाहनाने ९ लोक व त्यांना आणणारे दोन असे १२ लोक जिल्ह्यात आले होते़ त्यांना गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले होते़ यात शेख बिलाल शेख ईस्माईल, जुबेर मुसाजी गुला, हजला अफजल पठाण, खलील भुला मोहंमद, सिद्धीक फारुख पठाण, सुलामोद्दीन कुतुबोद्दीन बेलदार, अल्ताफ मुसाजी बारडोलीया सर्व रा़ नवापुर तसेच सादअली मोहम्मद हवेलीवाला, जावेद कमालोद्दीन तेली दोघे रा़ चिंचपाडा तसेच त्यांना वाहनाद्वारे जिल्ह्यात आणणारे जाहीर सय्यद व समीर शहा कलीम शहा दोघे रा़ नवापुर यांच्याविरोधात विविध कायद्यांतर्गत नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
त्यांच्याविरोधात नवापुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आऱबी़ बहरीवाल यांच्या न्यायालयात सहायक पोलीस निरीक्षक डिगंबर शिंपी यांनी दोषोरोपत्र सादर केले होते़ न्यायालयात कोरोनाच गांभिर्य लक्षात घेत सर्व १२ जणांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट करुन प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच हजार रुपयांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली़ पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाठक यांनी काम पाहिले़
सहायक पोलीस निरीक्षक शिंपी यांचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी कौतूक केले आहे़

नंदुरबार शहरातील जळका बाजार भागात लॉकडाऊन काळात २३ एप्रिल रोजी तंबाखूजन्य विक्री प्रकरणी अनंत गोपाल जयस्वाल याच्यावर कारवाई करण्यात आली होती़ पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी त्याची चौकशी करुन घराची झडती घेतली असता घरात ५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला होता़ अनंत जयस्वाल याच्याविरोधात गुन्हा दाखल होता़ त्याच्याविरोधात नंदुरबार प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी एऩबी़पाटील यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ तंबाकू विक्रीत दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याना २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ न्यायालयात पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते़

Web Title: Court fines 12 in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.